शेतकऱ्यांच्या देशव्यापी हिंदुस्थान बंद मध्ये सहभागी व्हा - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे आवाहन.

शेतकऱ्यांच्या देशव्यापी हिंदुस्थान बंद मध्ये सहभागी व्हा - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे आवाहन.

औरंगाबाद - केंद्र सरकारने पारित कृषी विधेयक मागे घ्यावे यासाठी दिल्लीच्या सीमेवर हिंदुस्थानातील शेतकऱ्यांचे १२ दिवसापासून आंदोलन सुरू आहे. या कायद्यात शेतकऱ्यांचा कुठलाही फायदा नसून भांडवलदाराच्या हिताचे विधेयक आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यात उस्फुर्तपणे बंद पाळला जाणार आहे. 
उद्या, ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या हिंदुस्थान बंद मध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, अंगीकृत संघटना, स्वयंसेवी संघटना आदींनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. केंद्रातील मोदी सरकार यावर तोडगा काढण्यात सपशेल अपयशी ठरले असून संतप्त शेतकरी संघटनांनी आता आर या पारचा इशारा दिला आहे. देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत या आंदोलनाला देशभरातील २० हुन अधिक प्रमुख पक्षांसह असंख्य संघटनांनी पाठिंबा देत बळीराजाचा आवाज बुलंद केला आहे. 

यावेळी आवाहन करतांना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, रोहयो मंत्री ना. संदीपान भुमरे, राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार, सहसंपर्कप्रमुख माजी महापौर त्रंबक तुपे, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाठ, आमदार उदयसिंग राजपूत, आमदार रमेश बोरणारे, आमदार, माजी आमदार किशनचंद तनवाणी, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर तथा युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, अनिल पोलकर, राजेंद्र राठोड, गणू पांडे, आनंद तांदुळवाडीकर, संतोष जेजुरकर, महिला आघाडीच्या संपर्क संघटक श्रीमती कला ओझा, सहसंपर्क संघटक सुनीता आउलवार, जिल्हा संघटक सुनीता देव, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी, सुशील खेडकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, बाबासाहेब डांगे, युवासेना जिल्हाधिकारी ऋषिकेश खैरे, जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, मनपा नगरसेवक, आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी केले आहे.

Post a comment

0 Comments