कोरोनामुळे यंदाचा कविता महोत्सव ऑनलाइन.


औरंगाबाद : सह्याद्री साहित्य, कला व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने डिसेंबरमध्ये आयोजित ’अखिल भारतीय कविता महोत्सव 2020’ या केवळ कवितेला वाहिलेल्या दोन दिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी, भाषांतरकार गणेश विसपुते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. 

महोत्सवाचे निमंत्रक डॉ. कैलास अंभुरे व डॉ. रमेश रावळकर यांनी ही माहिती दिली. तसेच यंदा कोरोनामुळे कविता महोत्सव ऑनलाइन घेण्याचे ठरले असल्याचेही त्यांनी नमूद केले. यंदा कोरोनामुळे ऑनलाइन आयोजित केलेल्या या कविता महोत्स्वात विविध राज्यांतून, परदेशांतून कवी, अभ्यासक, वक्ते यात सहभागी होत आहेत. सिव्हिल इंजिनिअर असलेल्या गणेश विसपुते यांनी साहित्य, चित्र, शिल्प इ. कलांमध्ये कार्य केले आहे. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट आंतरभारती केंद्राचेते कार्याध्यक्ष असून ’मायमावशी’ या भाषांतरविषयक नियतकालिकाचे संपादकही आहेत.
त्यांच्या अनेक कवितांचे हिंदी अनुवाद झाले आहे. 'आवाज नष्ट होत नाहीत’ या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा 2010-11 सालचा कवी केशवसुत पुरस्कार मिळालेला आहे. तसेच ’माय नेम इज रेड’ ला साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राचा बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार प्राप्त झालेला आहे. यापूर्वी झालेल्या सह्याद्री कविता महोत्सवाचे अध्यक्षपद कवी इंद्रजित भालेराव, निरंजन उजगरे, केशव मेश्राम, वर्जेश सोलंकी, नीरजा या प्रसिद्ध साहित्यिकांनी भूषविलेले आहे.


Post a comment

0 Comments