दोन जंगली माकडं इलेक्ट्रिक पोलवर चढले होते, त्यांना वायरचा शॉक लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तातडीने दाखल झाले. मात्र, तोपर्यंत तेथील काही अज्ञात मुलांनी दोन्ही मृत वानरांना राम नगर येथील डोंगरातील जमिनीत दफन केले, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी या पथकाला दिली. ठाणे वन विभागामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
0 Comments