महाविकास आघाडीचा फार्मूला येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत नसणार - जयंत पाटीलसातारा, दि.१९ डिसेंबर : ग्रामपंचायतीच्या निवडणुका या कोणत्याही पक्ष चिन्हावर, एबी फॉर्मवर लढविली जात नाहीत. प्रत्येक गावातील वेगवेगळे प्रश्न घेऊन स्थानिक गट उभे राहतात, त्यामुळे गावातील स्थानिक राजकारणावर गटांत निवडणूक चालत असल्याने महाविकास घाघाडीचा फॉर्म्युला असणार नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी येथे स्पष्ट केले.
 
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील हे गुरुवारी अल्पवेळ येथील शासकीय विश्रामगृहात थांबले होते. त्या वेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. विधान परिषदेच्या निवडणुकीप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीतही एकत्र लढण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे का, या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, ""मुळात ग्रामपंचायत निवडणुकीत कोणताही पक्ष चिन्हावर, एबी फॉर्मवर निवडणूक लढवित नाहीत. प्रत्येक गावातील वेगवेगळे प्रश्न घेऊन गट उभे राहात असतात. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांत पक्षाच्या राजकारणाव्यतिरिक्त गावातील स्थानिक राजकारणावर निवडणूक चालत असते. त्यामुळे ग्रामपंचायतीची निवडणूक महाविकास आघाडीकडून लढण्याचा प्रश्‍नच येत नाही.

संचालकांकडून स्वतःच्या संस्थांची कर्जे माफ; राजकारण अन्‌ विधानसभा डोक्‍यात ठेऊन प्रकल्पांच्या अनेक घोषणा!
 
शिक्षक, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत शिवसेनेच्या अपयशाबाबत विचारले असता श्री. पाटील म्हणाले, ""विधान परिषदेची ही निवडणूक एकत्र लढून महाविकास आघाडीने उमेदवार उभे केले होते. त्यामध्ये काही ठिकाणी यश मिळाले, तर काही ठिकाणी अपयश आले. कुणाला काय मिळाले ही परिस्थिती त्या ठिकाणच्या स्थानिक पातळीवर अवलंबून असते. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जरी कमी जास्त झाले असेल, तरी भविष्यकाळात त्याची भरपाई होईल.'' 

Post a comment

0 Comments