शहरात मागील काही दिवसांपासून क्रिकेटवर सट्टा चालवणारी सट्टेबाजांची टोळी कार्यरत असल्याची जोरदार चर्चा सर्वत्र होत होती. त्यामुळे पोलिस प्रशासन कमालीचे सतर्क झाले होते. त्या दृष्टीने जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक जयंत मिना यांनी अवैध धंद्यांच्या समुळ उच्चाटनासाठी स्थापन केलेले विशेष पथक पाळत ठेवून होते. विशेष पथकातील परिविक्षाधीन पोलिस उपाधीक्षक बापूराव दडस, पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत पवार, विश्वास खोले यांच्यासह पथकातील सहकारी पोलिस कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, यशवंत वाघमारे, राहुल चिंचणी, शंकर गायकवाड, जमीर फारुकी, आजहर पटेल, विष्णू भिसे, दिपक मुदीराज यांनी गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मंगळवार (ता. १५) डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कारवाई केली.
0 Comments