महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू.

महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा खळबळजनक दावा.

जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच राजस्थानमधील सरकार पाडण्यासाठी भाजप कट रचत असल्याचा आरोप गहलोत यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राजस्थानमधील काँग्रेस नेत्यांना भेटले, असं देखील अशोक गहलोत यांनी सांगितले आहे. देशात पाच सरकारं पाडली असून राजस्थान सरकारही पाडणार, असे भाजपच्या वतीने काँग्रेस आमदारांना सांगण्यात आले, असे गहलोत यांनी सांगितले.
अशोक गहलोत यांनी सांगितले की, भाजपने सांगितले होते, हे पाडण्यात येणारे सहावे सरकार आहे. त्यांच्या राज्यासोबतच महाराष्ट्रातील सरकारही पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा गौप्यस्फोट गहलोत यांनी केला आहे. गहलोत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. अमित शाह यांच्यावर गहलोत यांनी एक आरोप केला आहे. गहलोत म्हणाले, काँग्रेसच्या काही आमदारांसोबत अमित शाह यांनी एक बैठक घेतली, असे देखील गहलोत म्हणाले.

Post a comment

0 Comments