जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने अपंगत्व तपासणी व प्रमाणपत्र नोंदणी शिबीराचे आयोजन - आमदार अॅड. राहुल कुल यांची माहिती.

जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने अपंगत्व तपासणी व प्रमाणपत्र नोंदणी शिबीराचे आयोजन - आमदार अॅड. राहुल कुल यांची माहिती.

दौंड :- बोरमलनाथ मंदीर, बोरीपार्धी येथे दिव्यांग मेळाव्याचे आयोजन – आमदार अॅड. राहुल कुल यांची माहिती. 
कै.सुभाषआण्णा कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट व सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने व दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या सौजन्याने जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने अपंगत्व तपासणी व प्रमाणपत्र नोंदणी शिबीराचे आयोजन शुक्रवार दिनांक – ११ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत, श्री. क्षेत्र बोरमलनाथ मंदीर, बोरीपार्धी चौफुला, ता. दौंड या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी दिली आहे. 
 
पूर्ण किंवा अंशतः शारीरिक व्यंग, अंधत्व असलेल्या व्यक्तींना शासनाच्या विविध योजना, दिव्यांगासाठी उपलब्ध सुविधा किंवा सवलतींचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक अपंगत्व प्रमाणपत्र, ओळखपत्र मिळणेसाठी व एस. टी. प्रवास सवलतीचे कार्ड काढण्यासाठी सदर शिबिराद्वारे नागरिकांची तपासणी, नोंदणी केली जाईल. 

त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, रेशनकार्ड, मतदार पत्र, पासपोर्ट साईज २ फोटो, आधीचे अपंग प्रमाणपत्र (उपलब्ध असल्यास) हि सर्व कागदपत्रे मूळप्रत व झेरॉक्स २ सेट घेऊन गरजूंनी संपर्क साधावा व शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार अॅड. राहुल कुल यांनी केले आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी ७०३८६६७७९९ या क्रमांकावर संपर्क करावा अशी विनंती केली आहे.

Post a comment

0 Comments