सोन्याच्या किमतीत वाढ

मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमती वाढताना दिसत आहेत. वस्तुतः जागतिक बाजारातील वाढीचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येत आहे. आज सकाळी ११.२२वाजता सोन्याच्या भावात १५३ रुपयांची वाढ झाली आहे. १५३ रुपयांच्या वाढीसह दहा ग्रॅम सोन्याची किंमत ४९,३२५ रुपयांवर गेली आहे. कोरोनावरील लसीच्या बातम्यांचा परिणाम सोन्याच्या किमतींवर दिसून येतोय.
भारतीय बाजारात ऑगस्टपासून सोन्याच्या किंमतीत सुमारे ८००० रुपयांची घसरण झाली आहे. ऑगस्टमध्ये सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम ५६,३७९ रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली होती, ती आता ४७,८५६ रुपयांवर आली आहे. कोरोना लस आल्याच्या बातमीमुळे गुंतवणूकदारांनी सोन्यापेक्षा इक्विटी बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे जागतिक पातळीवर सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये घट कायम आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येतोय.

Post a comment

0 Comments