मोबाईलला नेटवर्क नसल्याने घराबाहेर आलेल्या अल्पवयीन तरुणीवर बलात्कार

औरंगाबाद : शेतवस्तीवर राहणाऱ्या एका अल्पवयीन युवतीवर दोन तरुणांनी मध्यरात्रीच्या सुमारास बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पैठण तालुक्यातील थेरगाव या गावातील पाचोड परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पाचोड पोलिसात दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पाचोडी पोलिसात शेतीवस्तीवर राहणाऱ्या घरामध्ये मोबाईलला नेटवर्क नसल्याने संभाषणास अडथळा येत होता. यामुळे पीडित मुलगी घराच्या बाहेर येऊन मोबाईलला नेटवर्क शोधत होती. मात्र त्याच वेळी ती बाहेर येताच त्या दोन तरुणांनी तिचं तोंड दाबून तिला शेतामध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
या घडलेल्या घटनेबाबत जर कोणाला सांगितले तर तुला मारुन टाकू अशी धमकी दिली. त्यानंतर त्या दोघांनी घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र या अल्पवयीन मुलीने रडत रडत घडलेला सर्व प्रकार सकाळी तिच्या आई-वडिलांना सांगितला.
यानंतर पीडित मुलीच्या आईवडिलांनी दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. जुनेद दस्तगीर पठाण (२३) आणि दिपक आहेर अशी या दोघा आरोपींची नावे आहेत. कलम ३७६ सह इतर कलमांतर्गत त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a comment

0 Comments