आजारपणाला कंटाळून वृध्द दांम्पत्याची जायकवाडीत आत्महत्या ; दुर्दैवी घटनेने खळबळ.

आजारपणाला कंटाळून वृध्द दांम्पत्याची जायकवाडीत आत्महत्या ; दुर्दैवी घटनेने खळबळ.

आजाराला कंटाळून शहरातील बूट-चप्पल व्यापारी सुर्यभान दयाराम राऊत 70 व त्यांच्या पत्नी कौशल्य सूर्यभान राऊत 65 या वृध्द दांम्पत्याने जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेञात आत्महत्या केली आहे.


पैठण : आजाराला कंटाळून शहरातील बूट-चप्पल व्यापारी सुर्यभान दयाराम राऊत 70 व त्यांच्या पत्नी कौशल्य सूर्यभान राऊत 65 या वृध्द दांम्पत्याने जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेञात आत्महत्या केली आहे. 

दोघांचे मृतदेह धरणाच्या पाण्यावर तरंगत असताना सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जाणार्‍या नागरिकांना हे मृतदेह पाण्यात तरंगतांना दिसून आले. ते शहरातील काला पहाड या भागातील रहिवासी होते.
या बाबत धरण नियंत्रण कक्षातील गणेश खराडकर यांनी पैठण पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली. उपनिरिक्षक रामकृष्ण सागडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. 

दोन्ही प्रेत उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सूर्यभान राऊत यांनी मृत्यू पूर्वी सोसाइड नोट सोडली असून त्यात ते शारीरिक व्याधीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमुद केले आहे.

पत्नी कौशल्याबाई यांनी देखील त्यांच्या पती सोबत आपली जीवन यात्रा संपवली आहे. मयत पती-पत्नी हे नित्यनेमाने धरणावर फिरायला जात असे. शुक्रवारी फिरण्यासाठी गेले असता हे दाम्पत्य घरी परतलेच नाही. 

शनिवारी त्यांचे मृतदेह धरणात तरंगतांना आढळून आले. सुर्यभान दयाराम राऊत यांचे शिवाजी चौकात चरण-सेवा नावाचे फुटवेअरचे दुकान आहे. सध्या ते दुकान त्यांचा मुलगा चालवत आहे. याघटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पैठण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

Post a comment

0 Comments