महाड मध्ये राष्ट्रवादीला पक्षाला धक्का राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत दाखल.रायगड, दि. ८ मंगळवार :  जिल्ह्यातील महाड तालुक्यातील असनपोई गावात राष्ट्रवादी पक्षाला जोरदार धक्का देत राष्ट्रवादिच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाड पोलादपुर माणगावचे कार्य सम्राट आमदार भरतशेट गोगावळे आणि दक्षिण रायगड जिल्हा युवासेना अधिकारी विकास गोगावळे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास दाखवत राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठठी देत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे 

आमदार भरतशेट गोगावळे यांच्या शिवनेरी या निवासस्थानी दक्षिण रायगड युवासेना अधिकारी विकास गोगावळे यांच्या उपस्थित आज असनपोई गावातील रवींद्र रामचंद्र खरोसे राष्ट्रवादी बिरवाडी विभाग सरचिटणीस, राजन ( हनुमंत) वसंत पवार, माझी तंटामुक्ती अध्यक्ष, प्रवीण भरत म्हस्के,अनिकेत रवींद्र खरोसे,निखिल रवींद्र खरोसे, आदित्य हनुमंत पवार, अमोल म्हस्के आदींनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला यावेळी युवासेना अधिकारी विकास गोगावळे विधानसभा संपर्क प्रमुख विजय सावंत,जिल्हा परिषद सदष्य संजय कचरे  शिवसेना उपतालुका प्रमुख राजेश गोळे,युवासेना संपर्क प्रमुख ईमराण पठाण,शिवसेना उपविभाग प्रमुख दिलीप म्हस्के,युवासेना बिरवाडी अधिकारी अशिष म्हस्के,असनपोई शाखा प्रमुख प्रकाश पवार,असनपोई युवासेना शाखा प्रमुख परेश सोनावळे,तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप सोनावळे,शाम गुडेकर,अमित शिवाजी जाधव,अजय गरुड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलत असताना विकास गोगावळे म्हणाले की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी काहीच दिवसांनी या निवडणूक जाहीर होण्याची चिन्ह दिसत आहेत आणि जिल्हा परिषद आणि पंचाईत समिती निवडणूक देखील तोंडावर येऊन ठेपल्या आहेत त्यामुळे जरी बिरवाडी जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती सदष्य आमच्या पक्षाचे असले तरीही विरोधकांना डोके वर काढता येणार नाही याचीच तयारी आमच्या मार्फत करण्यात येत असून असनपोई गावातील ग्रामपंचायत ही नव्व सदष्यांची ग्रामपंचायत असून ही ग्रामपंचायत काही तांञिक अडचणी मुले विना सरपंचाची जवळजवळ पाच वर्ष राहिली असून या ग्रामपंचायत वर प्रशासक बसले आहेत परंतु आता माञ असनपोई ग्रामपंचायतवर शिवसेना येक हाती सत्ता स्थापन करणार यात कोणतीही शंका नाही

तर प्रवेश करते यांच्याशी संपर्क साधला असता गावातील राष्ट्रवादीच्या कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून आम्ही राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठठी देत असून आणि आमदार गोगावळे आणि दक्षिण रायगड जिल्हा युवासेना अधिकारी विकास गोगावळे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन प्रवेश घेत आहे त्यामुळे असनपोई गावातील शिवसेना पक्षाची ताकद वाढताना दिसुन येत आहे तर गेल्या काही दिवसांपासून बिरवाडी विभागात राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात शिवसेना पक्षात प्रवेश घेत आहेत त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महाविकास आघाडीत बिघाड होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Post a comment

0 Comments