निविदा नसताना गोदापात्रातून अवैधरित्या वाळू उपसा सुरूच.

निविदा नसताना गोदापात्रातून अवैधरित्या वाळू उपसा सुरूच.

माजलगाव तालुक्यातील गंगामसला, काळेगाव थड्डी, शेलगाव,सूलतानपुर,पुरषोत्मपुरी,सांडस चिचोंली, गोविंदपूर,सादोळा,या गावातील नंदिपात्रातून केनी व जेसीबीच्या सहाय्याने दररोज वाळू उपसा व वाहतुक होत आहे.

माजलगाव: तालुक्यात कुठे हि टेंडर नसताना दिवसा नदीपात्रात केनी व जेसीबीच्या सहायाने बेसुमार वाळू उपसा करून ट्रक्टरने साठा करून रात्रीच्या वेळेस टिपर, हायवा गाड्या भरुन नदीपात्रात वाळू माफियांचा नंगानाच सुरु आहे. 
तसेच उघडपणे वाहतूक सुरू असताना देखील पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन कारवाईचे धाडस दाखवित नसल्याने या वाळू माफियांना अभय कोणाचे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
माजलगाव तालुक्यातील गंगामसला, काळेगाव थड्डी, शेलगाव,सूलतानपुर,पुरषोत्मपुरी,सांडस चिचोंली, गोविंदपूर,सादोळा,या गावातील नंदिपात्रातून केनी व जेसीबीच्या सहाय्याने दररोज वाळू उपसा व वाहतुक होत आहे. गोदावरी पात्रातुन वाळू तस्कारांनी धूमाकूळ घातला असून बेकायदेशीर वाळूचा बेसुमार उपसा केला जात असून या कडे महसूल विभाग दुर्लक्ष करित असल्याचे दिसून येत आहे. 

विशेष म्हणजे या भागात निविदा निघालेली नसताना वाळू उपसा मात्र जोरात सुरू आहे. काळेगाव थड्डी, सेलगाव, सुलतानपुर, सांडस चिंचोली या गावांच्या शिवारातील गोदापात्रातून अंधाराचा फायदा घेऊन हा वाळू उपसा होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Post a comment

0 Comments