स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रात्रभर जागरण आंदोलन.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रात्रभर जागरण आंदोलन.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारला सुबुद्धी येउदे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर गुरुवारी रात्री सात वाजल्या पासून बीड स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जागरण आंदोलन करण्यात आले.

बीड : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारला सुबुद्धी येउदे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर गुरुवारी रात्री सात वाजल्या पासून बीड स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जागरण आंदोलन करण्यात आले. रात्रभर हे आंदोलन सुरूच केले होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दिल्लीतील चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी रात्री सात वा.पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर जागरण करून करण्यात आले. 

या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, यांच्यासह सारिका गायकवाड व अन्य शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी महिला आंदोलकांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली व रात्री साधारण एक वाजेपर्यंत हे आंदोलन चालले. 

आंदोलनात सहभागी बीड जिल्हा युवक अध्यक्ष राजू गायके, प्रशांत कदम, लहू गायकवाड आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a comment

0 Comments