"तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबई बाहेर गेले"- शेलार 

मुंबई : आरेतील मेट्रो तीनचं कारशेड कांजूरमार्गला हलवण्यात आलं आणि त्यानंतर राज्यात मुंबईकरांच्या मेट्रोवरून राजकारण सुरु झालं. उच्च न्यायालयाने कांजूरमार्गमधील मेट्रो तीन कारशेड कामाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने प्रकल्प लांबू नये म्हणून पर्यायी जागांचा शोध घेण्यास सुरवात केली.अशात मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठी प्रस्तावित जागेवर मेट्रो तीनचं कारशेड हलवता येऊ शकेल का ? याची चाचपणी सुरु असल्याचं समजतंय. 
बुलेट ट्रेन नकोच म्हणताय. मेट्रो होऊच नये अशी व्यवस्था करताय आणि बेस्टचे खाजगीकरण करुन मुंबईकरांची महत्त्वाची व्यवस्था मोडित काढताय मुंबईकरहो! ठाकरे सरकारचा हा तीन तिघाडा. मुंबईकरांना भविष्यात प्रवासासाठी बहुतेक मिळणार "वातानुकूलित बैलगाडा!" असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे.

Post a comment

0 Comments