दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा ; सोयगावत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात कडकडीत बंद
 सोयगाव, दि. ८ मंगळवार : केंद्र सरकारने शेतकरी विरोधात आणलेले कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना व त्यांनी पुकारलेल्या भारत बंद ला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली सोयगाव शहर तसेच तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.
मंगलवार ( दि.८ ) रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी केंद्र सरकार विरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केले.

शेतकरी विरोधी कायदे रद्द न केल्यास शेतकरी केंद्र सरकारला त्यांची जागा दाखवून देईल

केंद्र सरकारने शेतकरी विरोधात आणलेले कायदे जुलमी कायदे असल्याची टीका महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. जर केंद्र सरकारने हे कायदे रद्द केले नाहीत तर शेतकरी या सरकारला त्यांची जागा दाखवून देतील असा उपरोधक टोला राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजप व केंद्रसरकरला लगावला. या आंदोलनात ना.अब्दुल सत्तार यांनी भाजप नेत्यांचा तसेच केंद्र सरकारच्या भूमिकेचा जोरदार समाचार घेतला. दिल्लीत शेतकरी आपल्या न्याय व हक्कासाठी संयमाने आंदोलन करीत होते. मात्र या सरकारने कडाक्याच्या थंडीत आंदोलकांवर पाण्याचे फवारे मारून हे आंदोलन दडपण्याचे प्रयत्न केले. इंग्रजांनी ही अशा प्रकारचा छळ देशातील शेतकऱ्यांचा केला नाही असा आरोप करीत लवकरच आंदोलक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन या कायद्यात सुधारणा करावी यासाठी एक दिवसाचे अधिवेशन बोलवावे नसता शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक दिल्लीत आले तर केंद्र सरकारच्या एका ही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असा गर्भित इशारा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला.

यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड, तालुकाप्रमुख प्रभाकरराव काळे, जि.प.सदस्य गोपीचंद जाधव, शहरप्रमुख संतोष बोडखे, तालुका संघटक दिलीप मचे,तालुका उपप्रमुख गुलाबराव कोलते, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ.इंद्रजित सोळंके, शहराध्यक्ष रविंद्र काळे,उस्मान पठाण, महेंद्र जाधव, धरमसिंग चव्हाण, कृष्णा राऊत, एकनाथ महाजन, चंद्रास रोकडे, रमेश गव्हांडे, योगेश पाटील, दिलीप देसाई, श्रीराम चौधरी, शरीफ शहा, शेख रउफ, सोपान देवरे, अक्षय काळे, महेश चौधरी, प्रकाश बोर्डे, विक्रम चौधरी, विनोद मिसाळ, विलास बोर्डे, दत्तू इंगळे, फेरोज पठाण, विठ्ठल आगळे, रशीद पठाण, रविंद्र बावस्कर, शेख सत्तार, जीवन पाटील, महंमद पठाण, दिनेश हजारी, दादाभाऊ जाधव, कुणाल राजपूत, मोतीराम पंडीत, डॉ.रघुनाथ फुसे, राजेंद्र गव्हाड, गणेश कापरे, अमोल मापारी, अरुण वाघ, शेख मुनाफ, हर्षल देशमुख,योगेश नागपुरे, बाबू चव्हाण, सलीम पठाण, मदन राठोड, शमा तडवी, राधेश्याम जाधव, सांडू राठोड, प्रताप राठोड, समाधान काळे, भगवान टोकरे, भगवान वारंगने, नंदू हजारी, सुधाकर पाटील, श्रीमती स्मिता पाटील, द्रौपताबाई सोनवणे, विजय पाटील, आत्माराम गोतमारे, किशोर मापारी, राजू एलिस, निकेश बिर्ला, प्रमोद रावणे, मनोज देसाई, संदीप बागले, शेख राजू, संजय दामोधर, शेख मुजीब, इम्रान शहा, विनोद तेली, शेख अजीज, सांडू तडवी, कृपालसिंग बातळे, शेख अकिल, शेख बबलू, जाकेर देशमुख, जावेद पिंजारी आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव, शिवसेना व युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते

Post a comment

0 Comments