बबल अप्लिकेशन वरील महिलेशी मैत्री पडली तरुणाला महागात

देहूरोड, पुणे - बबल ॲप्लीकेशन वरुन महिलेशी झालेली मैत्री रावेत मधील तरुणाला महागात पडली आहे. तरुण महिलेला भेटायला बाहेर गेला तिथून जेवण करण्यासाठी तिला स्वत:च्या घरी घेऊन आला. मात्र, महिलेनं त्याला पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध दिले व तरुणाच्या अंगावरील सोन्याची चैन व अंगठी पळवून नेली. रावेतमध्ये शुक्रवारी (दि.११) हा प्रकार उघडकीस आला आहे. 
याप्रकरणी शिवराज सुरेश शिंदे (वय २८, रा. कृष्णा हाईट्स, रावेत ) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिखा नलावडे पाटील या महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवराज व आरोपी शिखा यांची बबल मोबाईल ॲप्लीकेशन वरुन मैत्री झाली. दोघेजण भेटण्यासाठी शिवाजीनगर येथे गेले. त्यानंतर जेवण करण्यासाठी तरुण महिलेला त्याच्या घरी घेऊन आला. जेवण करत असताना लहुशंखेसाठी तरुण निघून गेला, यावेळेत महिलेनं त्याच्या पिण्याच्या पाण्यात गुंगीचे औषध मिसळले. गुंगीचे औषध असलेले पाणी तरुणाने पिल्याने तरुणाला गुंगी आली व तो झोपला. तरुण झोपला असताना आरोपी महिलेनं त्याच्या अंगावरील सोन्याची चैन,अंगठी व आयफोनचा इअरफोन चोरून नेला आहे. 
सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल जाधव अधिक तपास करत आहेत.

Post a comment

0 Comments