संवेदनशील मार्गावरील एसटीची वाहतूक उद्या बंद.

संवेदनशील मार्गावरील एसटीची वाहतूक उद्या बंद.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे सर्व आगारांना आदेश.

मुंबई :- उद्याच्या 'भारत बंद'च्या पार्श्वभूमीवर संवेदनशील मार्गावरील एसटीची वाहतूक बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेण्याचे आदेश प्रशासनाने राज्यातील सर्व आगारांना दिलेत. एसटीच्या स्थानिक प्रशासनाने माहिती घेऊन त्या-त्या मार्गावरची वाहतूक सुरू ठेवायची की नाही याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे. 
यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी असेही निर्देश देण्यात आले आहेत. ज्या रस्त्यावर, मार्गावर आंदोलन होत आहेत, अशा मार्गांवरून वाहतूक करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. 

त्याच पार्श्वभूमीवर उद्या म्हणजे 8 डिसेंबरला देशव्यापी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या संपात एपीएमसीच्या सर्व बाजारपेठा सहभागी होणार असून, त्या दिवशी संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे.

त्यामुळे या विरोधात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आदी राज्यांतील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नवी मुंबई एपीएमसी मधील पाचही मार्केट बंद राहणार आहे. तसेच राज्यातील नाशिक, पुणे, नगर, कोल्हापूरमधील बाजार समित्या देखील उद्याच्या बंद मध्ये सहभागी होतील.

Post a comment

0 Comments