महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची खुलताबाद तालूका कार्यकारीणी जाहीर ! तालुकाध्यक्षपदी राजेंद्र बढे तर सचिवपदी प्रा. सयद इरफान यांची एकमताने निवड !खुलताबाद : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई  खुलताबाद तालूका कार्यकारीणी जाहीर झाली असून तालूका अध्यक्षपदी  राजेंद्र बढे तर तालुका सचिवपदी प्रा.सय्यद इरफान  यांची  निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांचा व सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला  .

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे
यांच्या मार्गर्शनाखाली औरंगाबाद जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. प्रभू गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार रोजी शहरातील विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .या बैठकीत जिल्हा सचिव दीपक म्हस्के, जिल्हा संघटक विलास शिंगी, जिल्हा कोषाध्यक्ष मुकेश मुंदडा, जिल्हा उपाध्यक्ष छबुराव ताके , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज पाटणी , शिवाजी गायकवाड,रवी वैद्य आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती 

या बैठकीत संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. प्रभू गोरे यांनी सर्वानुमते  खुलताबाद तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची कार्यकारीणीची घोषणा  केली.यात तालुकाध्यक्षपदी पत्रकार राजेंद्र बढे,उपाध्यक्षपदी पत्रकार संतोष करपे, कार्याध्यक्षदी पत्रकार शेख जमीर,सचिवपदी प्रा. सयद इरफान  ,कोषाध्यक्षपदी सलमान खान, प्रसिध्द प्रमुख रमेश माळी यांची तर सदस्यपदी  रमणलाल पंजाबी, जुबेर पटेल, नामदेव नलावडे,आरेफ पटेल, विठ्ठल पाटे, संदेश केरे, हबिब शेख , ज्ञानेश्वर वदरे, मल्लिकार्जुन काळे, रमेश आधाने, अतुल वेताळ यांची  निवड करण्यात आली . नूतन  पदाधिकारी व सदस्यांना जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. प्रभू गोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.  

निवडीनंतर  प्रा. डॉ.प्रभू गोरे म्हणाले की, आगामी काळात पत्रकार संघाचे संघटन अधिक मजबुत करुन पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील तसेच पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाला संघटितपणे वाचा फोडण्याचे काम पत्रकार संघाच्या माध्यातून करण्यात येईल, तसेच उपक्रमशील आणि क्रियाशील पत्रकार संघ म्हणून काम करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.यावेळी नुतन तालुकाध्यक्षासह संपूर्ण कार्यकारिणी सदस्यांना उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देवून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमासाठी तालूक्यातील पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक मनोहर गावडे यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष शेख जमीर यांनी मानले.

Post a comment

0 Comments