नव्या नियमाचा फटका जास्त पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना.

नव्या नियमांमुळे पुढच्या वर्षीपासून हातात येणार कमी पगार.

नव्या नियमाचा फटका जास्त पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना.

नवी दिल्ली - लॉकडाउनमुळे आर्थिक समस्या सुरु असतानाच आता नोकरदार वर्गाची चिंता आणखी वाढणार असल्याची शक्यता आहे. पुढील वर्षी एप्रिलपासून देशात नवीन वेतन नियम लागू होणार आहे. या नव्या नियमांमुळे फक्त प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी बरोबरच हातात येणाऱ्या पगारावरती देखील परिणाम होणार आहे. 
केंद्र सरकारने मागील वर्षी संसदेत वेज कोड विधेयक मंजूर केले होते. ते आता पुढील वर्षीपासून लागू होईल. केंद्र सरकारने नवीन वेज कोड विधेयक २०१९ मध्ये मांडले होते. 

हे विधेयक मंजूर झाल्यानंतर कायदा अस्तित्वात आला आहे, त्यातील नियम एप्रिल २०२१ पासून म्हणजे पुढील वर्षीपासून लागू होतील. याचा परिणाम हातात येणाऱ्या पगारावर होणार आहे.
पुढील आर्थिक वर्षापासून खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही पगार निश्चित केला जाणार आहे. नव्या नियमानुसार कर्मचाऱ्याला दिले जाणारे भत्ते एकूण पगाराच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही. 

म्हणजेच मूळ वेतन ( सरकारी नोकरीत मूळ वेतन अधिक महागाई भत्ता) हे एकूण पगाराच्या ५० टक्के किंवा जास्त असतील. या नव्या नियमांमुळे वेतन रचनेत मोठे बदल होणार आहेत. या नव्या नियमाचा फटका जास्त पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसणार आहे. कारण नव्या नियमामुळे भत्त्यांची रक्कम कमी होणार आहे. जास्त पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात अधिक भाग भत्त्यांचाच असतो. 

त्याचबरोबर पीए आणि ग्रॅच्युटी वाढणार असल्याने कंपन्यांकडून हा आर्थिक भार देखील कर्मचाऱ्यांवरच टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे हातात येणारा पगार कमी होण्याचा अंदाज अर्थ विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे.

Post a comment

0 Comments