चक्क आदित्यनं आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल!!


औरंगाबाद, दि.३० डिसेंबर: जाधव कुटुंबातील वाद मागील काही वर्षापासून चालू आहे  परंतु आता  एक नवीन  वळण या कुटुंबान घेतला आहे. वृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरण कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव  पुण्यात अटकेत आहे. मात्र, त्याच्या अनुपस्थितीत कन्नडच्या राजकाराणात नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची  रणधुमाळी सुरू आहे. य पार्श्वभूमीवर हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनलची घोषणा करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे अकरावीत शिकत असलेले त्यांचा सुपुत्र आदित्य जाधव यांनं थेट पत्रकार परिषद घेऊन वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली. धक्कादायक म्हणजे हर्षवर्धन यांचे पॅनल हे त्यांची पत्नी व भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या विरोधात उभे करण्यात आले आहे.

Post a comment

0 Comments