रत्नागिरीला फिरायला गेलेल्या तिघांचा मृत्यू, मूळचे पुण्यातील रहिवासी होते.

रत्नागिरी- पुण्यातील सहा पर्यटक रत्नागिरीच्या आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर बुडाल्याची घटना घडली आहे. सहापैकी तिघांना वाचवण्यात यश आले असूनपुण्यातील औंध येथील निहाल चव्हाण, अक्षय राखेलकर, उबेस खान, रोहित पलांडे, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे यांच्यासह अन्य 14 पर्यटक रत्नागिरीला फिरण्यासाठी गेले होते.
  ते दापोली तालुक्यात थांबले होते. शुक्रवारी दुपारच्या वेळेला हे सर्व पर्यटक आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर पोहोण्यासाठी गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात उतरलेले सहा पर्यटक पाण्यात बुडाले. त्यातील तिघांचा मृत्यू झाला असून तिघांना स्थानिकांच्या मतदीने वाचवण्यात यश आले आहे.  तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर पुण्याचे सहा पर्यटक रत्नागिरीत फिरायला गेले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर दापोली पोलिस घटनास्थळी पोहोचले होते. 

पर्यटक बुडत असल्याचे पाहून त्यांच्या साथीदारांनी आरडाओरड केला. त्यावेळी तेथे असणाऱ्या काही स्थानिक लोकांनी पाण्यात उड्या घेतल्या. स्थानिकांनी तिघांना सुखरुप बाहेर काढले, पण अन्य तिघांना ते वाचवू शकले नाहीत. वाचवण्यात आलेल्या तिघांना दापोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे. 
स्थानिकांनी तरुणांना वाचवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. पण, तीन पर्यटक पाण्यात दिसेनासे झाले होते. या घटेनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. दापोली पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने तिघांचा शोध घेतला. काही वेळाने तिघांचे मृतदेह आढळून आले. दापोली पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली केली आहे. 

Post a comment

0 Comments