एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे आपले उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीत उभे करणार

नांदेड:- एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे आपले उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीत उभे करणार आहे. ज्या गावात आपली ताकत आहे , तिथे हे दोन्ही पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला आता भाजपसह या दोन्ही पक्षांचे आव्हान मिळणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील १०१४ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सध्या लगबग सुरु आहे. नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात काँग्रेस, शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे प्राबल्य आहे. मात्र या चारही पारंपारिक राजकीय पक्षांना आता ग्रामपंचायत निवडणुकीत देखील एमआयएम आणि वंचित आघाडीने आव्हान दिलं आहे. बहुतेक वेळा काँग्रेसच्या मतांची विभागणी करण्यात एमआयएम आणि वंचित आघाडीचा मोठा वाटा असतो, हे आजवरच्या निवडणुकीतून स्पष्ट झालंय. आता ग्रामपंचायत निवडणुकीतदेखील अशीच मतविभाजनी झाली तर त्याचा काँग्रेसला मोठा फटका बसण्याची भीती राजकीय निरीक्षक व्यक्त करतायत.

Post a comment

0 Comments