रविवारी (६ डिसेंबर) रात्री नऊ वाजेच्या सुमारास कल्याण स्टेशनवर कर्तव्य बजावीत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याची नजर एका लहान मुलीवर गेली. सध्या ऑपरेशन मुस्कान सुरु असल्याने पोलीस लहान मुलांवर नजर ठेवून राहतात. ही सात वर्षांची मुलगी ट्रेनमधून उतरल्यावर पोलीस कर्मचाऱ्याने तिची विचारपूस केली. मात्र मुलगी काही एक बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. पोलीस कर्मचाऱ्याने या मुलीला थेट पोलीस ठाण्यात आणले.
0 Comments