झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्काने पट्टेवाटप करा - योगेश पवार.

झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्काने पट्टेवाटप करा - योगेश पवार.


सोलापूर - शहारातील झोपडपट्टीधारकांना नागपूरच्या धर्तीवर मालकी हक्काच्या पट्ट्यांचे वाटप करण्यात आले तर याचा लाभ घोषित झोपडपट्ट्यांमधील बहुतांश झोपडपट्टीधारकांना व बहुजन समाजातील लोकांना होईल. 

तसेच झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप केल्याने त्यांना बांधकाम करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेणेही शक्य होईल. त्यामुळे आवास योजनावरील शासनाचा खर्चही कमी होईल. 

सोलापूर शहरातील विविध भागांत महापालिका, रेल्वे यासह खाजगी मालकीच्या जागांवर मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या वसल्या आहेत. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून वसलेल्या झोपडीधारकांना मालकी हक्क देण्याची मागणी छावाचे योगेश पवार यांनी मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री आणि पालिका आयुक्त यांचेकडे केली आहे.

Post a comment

0 Comments