आय.ए.एस. आधिकारी बनून समाजाचा शाक्ष्वत विकास करणार - संतोष मिमरोट


औरंगाबाद | समाजसेवेची आवड असल्याने पहिल्या पासूनच मोठा आधिकारी होण्याचा निक्ष्चिय केला होता. यासाठी अभियांत्रिकी, पत्रकारिता व कायद्याचे शिक्षण देखील घेतले. शिक्षण पूर्ण करून प्रत्यक्ष काम करीत असताना अनेक अनुभव आले. सध्या समाजातील सर्वच घटकांसाठी शाश्वत विकास करण्याचे स्वप्न असून यासाठी आय.ए.एस. ची तयारी सुरू असल्याचे संतोष मिमरोट यांनी सांगितले.
ऐतिहासिक औरंगाबाद हराचा सर्वांगीण विकास झपाट्याने होत आहे.असे असले तरी काही समस्याही आहेतच, या समस्या दूर करण्यासाठी व शहराचा विकास  करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे, जेव्हा हे होईल तेव्हा आपले शहर जगात नंबर एक होईल,असा आशावाद स्थापत्य अभियंता संतोष मिमरोट यांनी  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात व्यक्त केला.                          यावेळी अष्टपैलू युवा व्यक्तिमत्त्व संतोष मिमरोट यांनी मनमोकळ्यापनाने संवाद साधला.  त्यांनी नेमका विकास म्हणजे काय?  याबाबत स्पष्ट मते मांडली.  विकास म्हणजे फक्त भव्य दिव्य शहरे नसून स्वतः आत्मनिर्भर बनुन स्वतः चा व समाजाचा विकास करणे म्हणजे संपूर्ण विकास होय असे मत मांडले.  दै.देशोन्नतीचे निवासी संपादक सुनिलचंद्र वाघमारे यांनी त्यांचे स्वागत केले.

अभियांत्रिकी, पत्रकारीता, कायद्याचे शिक्षण घेतलेले  संतोष मिमरोट  आय.ए.एस.ची तयारी करत आहेत.गुरूकुल ही शैक्षणिक संस्था , फुट वेअर स्माँल स्केल कंपनी व सध्या औरंगाबाद मनपामध्ये स्थापत्य  अभियंता म्हणून ते यशस्वी काम करत आहेत. पुढे बोलताना मिमरोट म्हणाले की,ज्या कामामुळे आपल्याला आत्मीक समाधान मिळते ते काम प्रामुख्याने करावे .मी नेहमी आशा कामांनाच प्राधान्य देतो. 

जनसेवेची आवड असल्याने त्यांनी नौकरी करत असतानाच समाजातील गरजु लोकांना मोफत कायद्याचे माग्रर्दशन करत आहेत.  40 नागरिकांचा न्यायालयीन खर्च देखील त्यांनी स्वतः केला आहे. 
शहरा विषयी त्यांनी सांगितले की, औरंगाबाद शहर ही संतांची भुमी आहे. आशिया खंडातील सर्वात वेगवान वाढणारी औद्योगिक वसाहत आहे, चळवळीचे मुख्यालय म्हणून हे शहर ओळखले जाते . त्यामुळे या शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांची ही जबाबदारी आहे की आपल्या शहराचे नाव कोणत्याही परिस्थितीत बदनाम झाले नाही पाहिजे ‌. आपले शहर चांगल्या पद्धतीने देशात, जगात  नावारूपाला आले पाहिजे. यासाठी जेवढी जबाबदारी प्रशासनाची आहे तेवढीच लोकप्रतिनिधी व सामान्य नागरिकांची देखील आहे.
......चौकट......
कोरोना काळातील जनसेवा......!
कोरोना महामारीमध्ये मी  मनपा आयुक्तांनसोबत  एम.एच.एम.एच. सांभाळले व सर्व जनतेला आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. याकाळात अनेक चांगला वाईट अनुभव आला. परंतु समाजासाठी काम केल्याचे समाधान देखील मीळाले.

आजच्या वार्तालाप  कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रा. डॉ.प्रभू गोरे,संघटक विलास शिंगी, कोशाध्यक्ष मुकेश मुंदडा, प्रसिद्धी प्रमुख मनोज पाटणी, सरचिटणीस नारायण जाधव पाटील, एच.आर.लहाणे,   जाँन भालेराव, निलम कांबळे, सिद्धी घायाळ, ऐ.बी. सावंत, सतिष छापेकर, सचिन अंभोरे, तुकाराम राऊत, माजेद खान यांच्यासह विविध दैनिकाचे ३५ पत्रकार  उपस्थित होते.

Post a comment

0 Comments