अनेक दशके खासदार राहिलेले शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचं निधन.
मुंबई, दि.१८ डिसेंबर : 
  मुंबईतील लालबाग परळ भागात गेली अनेक दशके खासदार राहिलेले शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचं निधन झालंय. रावले काही दिवस गोव्यात होते, ते गोव्यात असताना त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्याचे निधन झाले आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी मोहन रावले यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.  
मोहन रावले यांचं पार्थिव आज गोव्यातून मुंबईत आणलं जाणार आहे. त्यानंतर रात्री किंवा उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मोहन रावले यांच्या निधनानंतर शिवसेनेतून भावुक प्रतिक्रिया समोर येतायत. शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी मोहन रावले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्याबाबत त्यांनी ट्विट केलंय.

https://twitter.com/rautsanjay61/status/1340134234527297537?s=19

"शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्ह्ते. परळ ब्रँड शिवसैनिक हीच त्याची ओळख. मोहन पाच वेळा खासदार झाला. पण अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहीला, त्यांना विनम्र श्रद्धांजली" असं संजय राऊत म्हणाले. 


अत्यंत कडवट शिवसैनिक म्हणून मोहन रावले यांची ओळख. मोहन रावले हे आधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अंगरक्षक होते. त्यानंतर सक्रिय राजकारणात त्यांनी प्रवेश केला. मोहन रावले हे पाच वेळा खासदार राहिलेत. मातोश्रीचे आणि मोहन रावले यांचे अत्यंत निकटचे संबंध. मुंबईतील गिरणी कामगारांसाठी मोहन रावले यांनी अनेक आंदोलने केलीत. शिवसेना स्टाईलमध्ये नव्हे तर उपोषणाला बसून रावले यांनी अनेक आंदोलने केलीत. मुंबईतील लालबाग आणि परळ भागात शिवसेना पक्ष वाढवण्यात मोहन रावले यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. म्हणूनच  लालबाग परळ ब्रँड शिवसैनिक ही मोहन रावले यांची ओळख.  


Post a comment

0 Comments