शासनाला आली जाग, मराठा तेज न्युज चा दणका.सहा महिन्यांपासून बंद पडलेला रोड , रात्रीतून डांबर टाक्या आल्या कामावर.

[ हुंन्डा.गंगापट्टी येथील गावकऱ्यां तर्फे सा.बांधकाम भोकर व उमरी तहसील कार्यालयात काल दिले होते.आमरण उपोषणाचे निवेदन.] 
उमरी : प्रतिनिधी (बळवंत थेटे) उमरी तालुक्यातील शिंधी ते हुंन्डा गंगापट्टी या गावच्या रस्त्याचे सहा महिन्यांपासून काम चालू होते.गुत्तेदार हा सहा महिन्यांपासून शिंधी ते हुंन्डा रोड करीत आहे. थातूर माथूर काम कसे तरी चालू होते.पण हुंन्डा.गंगापट्टी पाटी पासुन गावात जाणारा एक किमी अंतर असलेला रोड अचानक गुत्तेदारानी काम बंद पाडले.सहा महीन्यापासुन गावकऱ्यांचे होत आहेत हाल.गावात जाणारा रोड कसाबसा चांगलाच होता.पण आर्ध्यारोड धरून किट्टी टाकण्यात आली.आर्ध्यारोड वरून जाताना .दोन चाकी वाहणाला सुध्दा जाता येत नाही.
अश्यातच गावकऱ्यांनी निर्णय घेतला.आणि काही गावातील व्यक्ती तर्फे सां.बांधकाम भोकर व उमरी तहसील कार्यालयात निवेदन दिले. सहा महिन्यांपासून होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर गावकऱ्यांने घेतला आमरण उपोषणाचा इशारा.पण शासनास किंवा गुत्तेव्दारास सहा महिन्यांपासून काही जाग येईना.
काल मराठा तेज न्युज  चा दणका देताच रात्रीतून शासनाला आली जाग, रात्रीतून पडल्या रोडवर डांबर टाक्या.

Post a comment

0 Comments