पैठण शहरात "तालुका क्रीडा संकुल" उभारण्यात यावे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी लिगल सेल पैठण यांची मागणी.

पैठण, दि.२१ सोमवार : 'शैक्षणिक क्रांतीचे जनक' "राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या" नावाने पैठण शहरात "तालुका क्रीडा संकुल" उभारण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी लिगल सेल पैठण च्या वतीने तहसीलदार (पैठण) यांच्याकडे (दि.२१) करण्यात आली आहे. 
,राज्य शासनाने "तालुका तेथे क्रीडा संकुल" असे धोरण स्वीकारले आहे यात विभागीय स्तर,जिल्हा स्तर आणि तालुकास्तरीय क्रीडा संकुलाचा समावेश आहे.              राज्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा उपलब्ध व्हावात यासाठी त्रिस्तरीय क्रीडासंकुलांची उभारणी करण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारले आहे.ग्रामीण भागातील होतकरू मुलांना खेळात             नपुन्य प्राप्त करण्याची संधी    उपलब्ध व्हावी हा या धोरणाचा उद्देश आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्याचे शासनाचे धाेरण असताना देखील पैठण तालुक्यात मात्र अद्यापही तालुकास्तरीय क्रीडा संकुल उभारण्यात आलेले नाही. परंतु पैठण तालुक्या व्यतिरिक्त बऱ्याच ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्यात आल्याचे दिसून येते. पैठण तालुक्यातील युवकांमध्ये क्रीडा विषयाबाबत विशेष आकर्षण आहे तसेच पैठण तालुक्यात खेळाडूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच पैठण तालुक्यातील मुला-मुलींनी व महिलांनी शहर, तालुक्याचे नाव              देशपातळीवर पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पैठण तालुक्यातील खेळाडूंमध्ये पात्रता निश्चितच आहे, परंतु त्यांना त्या प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत तसेच पैठण शहरात असणाऱ्या स्टेडियमवर शहरातील, तालुक्यातील अनेक खेळाडू सराव करत असतात.                                          परंतु स्टेडियमवर खेळाडूंसाठी विशेष अशा कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. तरी देखील खेळाडूंकडून तेथे कसाबसा सराव केला जातो. मात्र शासन प्रशासनामार्फत तालुक्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ठोस पावले उचलतांना दिसून येत नाहीत. त्यामुळे पैठण शहरात सर्व सुविधायुक्त तालुका क्रीडा संकुल लवकरात लवकर उभारण्यात यावे जेणेकरून पैठण तालुक्यातील सर्व खेळाडूंना खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळून क्रीडा क्षेत्राला देखील चालना मिळेल व ग्रामीण भागातून प्रतिभावान खेळाडू तयार होतील.श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा चालविणारे तसेच सामाजिक बंधूभाव, समता, दलित      उपेक्षीत बांधवांचा उद्धार,शिक्षण, शेती,उद्योगधंदे, कला, क्रीडा व आरोग्य,इ.क्षेत्रांमध्ये अद्वितीय  स्वरूपाचे कार्य करणारे                                  'शैक्षणिक क्रांतीचे जनक' "राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या" नावाने पैठण शहरात "तालुका क्रीडा संकुल" उभारण्यात यावे यासाठी तहसीलदार पैठण यांना निवेदन देण्यात आले यावेळी अँड.सुभाष बाबुराव खडसन (तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी) व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a comment

0 Comments