पुणेकरांसाठी रिक्षा सेवा राहणार बंद

पुणे : केंद्र सरकारने आणलेल्या तिन्ही कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला पुण्यातूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्यात आला आहे. भारत बंदला प्रतिसाद देण्यासाठी पुण्यामध्ये सर्वपक्षीय संघटना रस्त्यावर उतरणार आहे. अलका चौकातून सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार होता. पण यासाठी परवानगी नाकारण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रिक्षा वाहतूक बंद असणार आहे. 

Post a comment

0 Comments