उद्या भारत बंद ; दुध-फळ-भाजीपालाही मिळणार नाही.

उद्या भारत बंद ; दुध-फळ-भाजीपालाही मिळणार नाही.

भारत बंद दरम्यान चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी, वस्तु व सेवांच्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. या काळात दूध, फळ, भाजीपाला यांचीही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : -   केंद्र सरकराच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शेतकरी मागील 12 दिवसांपासून दिल्लीच्या सिमेवर आंदोलन करत आहेत. 

मोदी सरकार नवीन कृषी कायदा रद्द करत नसल्याने शेतकऱ्यांनी उद्या भारत बंदची घोषणा केली आहे. या भारत बंदला देशातील अनेक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. या भारत बंद दरम्यान चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी, वस्तु व सेवांच्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. या काळात दूध, फळ, भाजीपाला यांचीही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
शेतकरी कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत दाखल झाल्यानंतर या मागण्यांवरून शेतकऱ्यांनी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. 

सरकारसोबत पाच वेळा चर्चा होऊनही कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. उद्या म्हणजे ८ डिसेंबर रोजी भारत बंद पाळला जाणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत भारत बंद पुकारण्यात आला आहे. विविध राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांनी या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. 

बंद दरम्यान चक्का जाम आंदोलन केले जाणार असल्याने वस्तु व सेवांच्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. या काळात दूध, फळ, भाजीपाला यांचीही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. योगेंद्र यादव भारत बंदची माहिती देताना म्हणाले की, बंददरम्यान चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. या काळात दूध, फळ, पालेभाज्या यांची वाहतूक बंद राहणार आहे. मात्र, विवाह सोहळे व अत्यावश्यक सेवांमध्ये कुठलाहीअडथळा निर्माण केला जाणार नाही. 

भारत बंद सकाळी सुरू होणार आहे. याकाळात सर्व व्यवहार बंद राहणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजेनंतर चक्का जाम आंदोलन मागे घेण्यात येणार आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे. दिल्लीला येणारे सर्व रस्ते बंद करण्यात येतील असा कडक इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांही बंद : शेतकरी आंदोलन पेटले आहे. महाराष्ट्रातूनही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन कायद्याविरोधात राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील तमाम माथाडी कामगार आणि व्यापारी संप करणार आहे. 

उद्या भारत बंदमध्ये मुंबई, नवी मुंबई, तुर्भे इथल्या 5 बाजार समित्या बंद असणार असून पुणे, नाशिक एपीएमसी, यवतमाळ जिल्ह्यातील बाजार समित्या बंद राहणार आहे.

Post a comment

0 Comments