मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याच्या घोषणेमुळे सर्व मनसे नेते, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष हे वेगाने लागले तयारीला.

बारामती : महाराष्ट्र नवनिर्माण सेने हा फक्त मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरात अस्तित्वात आहे, अशी टीका नेहमी केली जाते. परंतू, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुका मनसे लढवेल अशी घोषणा केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तसेच मनसे जर गाव पातळीवरच्या निवडणुकीत ताकदीनिशी उतरली तर याचा फटका नेमका महाविकास आघाडीला बसणार की भाजपला हे पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे. 
राज ठाकरे यांच्या ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याच्या घोषणेमुळे सर्व मनसे नेते, जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष हे वेगाने तयारीला राहिले आहे. कार्यकर्त्यांच्या बैठका सुरु झाल्या आहेत. सध्या रिव्हर्स मोडवर असलेले मनसे इंजिन ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये नशीब आजमावत पुन्हा एकदा रुळावर येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. म्हणून मनसेने आपला मोर्चा गाव पातळीवर वळविला आहे. 

Post a comment

0 Comments