कुणी किती मागणी करो, प्रथम कोरोना योद्ध्यांनाच लस. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण.

कुणी किती मागणी करो, प्रथम कोरोना योद्ध्यांनाच लस.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण.

जालना : देशासह राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहे. तर, दुसरीकडे कोरोनाची लस निर्मिती अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नुकताच कोरोना लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या भेटी घेत आढावा घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वांचे स्पष्टीकरण दिले आहे. 
कुणी कितीही मागणी केली, तरी कोरोना योद्ध्यांनाच प्रथम लस दिली जाणार आहे, असे मंञी टोपे म्हणाले आहे.
आज आरोग्य मंञी रोजेश टोपे यांनी जालना येथील माध्यमांशी बोलताना कोरोना लसीवर माहिती दिली. कोरोनाची लस आल्यानंतर प्रथम श्रेणीत ती लोकप्रतिनिधींना देण्यात यावी, अशी मागणी झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे. त्यावर, अशी कुठलीही मागणी झालेली नाही, असे मंञी टोपे यांनी स्पष्ट केले. तसेच, कोरोना लस आल्यानंतर ती पहिल्यांदा डॉक्टर आणि पोलिस कर्मचाऱ्यांनाच देण्यात येणार आहे, अशी माहिती मंञी टोपे यांनी दिली आहे. 

कोरोना लस कुणाला द्यावी, त्याचे वर्गिकरण कसे व्हावे याचे संपूर्ण नियंत्रण केंद्र आणि राज्य सरकारकडे आहे. प्रोटोकॉलनुसारच लस देण्यासंदर्भात विचार केला जाईल, असे टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

Post a comment

0 Comments