बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा.

मुंबई: महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाबाबत मोठी घोषणा केली आहे. १४ एप्रिल २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण होईल, अशी घोषणा मुंडे यांनी केली आहे. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवरांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. त्यावेळी झालेल्या छोटेखानी समारोहात धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केली आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करु असं आश्वासन दिलं आहे. डॉ. आंबेडकर यांचे स्मारक लवकरात लवकर करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. कोरोनामुळे काही अडचणी आल्या आणि त्यामुळे काम रखडलं, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.

Post a comment

0 Comments