राज्यात सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा, तरुणांनो रक्तदान करा; राजेश टोपेंचं आवाहन

जालना: राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अत्यंत धक्कादायक माहिती दिली आहे. राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच त्यांनी तरुणांना मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचं आवाहनही केलं आहे.
जालना येथे पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी हे आवाहन केलं आहे. राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. एरव्ही तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर रक्तदान करत असतो. मात्र लॉकडाऊनच्या काळात अनेक महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्था बंद होत्या. त्यामुळे रक्तदान शिबिरं झाली नाही. परिणामी रक्तसाठ्यावर परिणाम झाला. आता आपल्याकडे केवळ पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उरला आहेस, असं टोपे म्हणाले.
पवारांच्या वाढदिवशी रक्तदान करा
येत्या १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तरुण वर्गाने पुढे येऊन रक्तदान करावं. त्यामुळे रक्तसाठ्यातील उणीव भरून काढता येईल, असं त्यांनी सांगितलं

Post a comment

0 Comments