शेतकऱ्यांच्या भारत बंदला काँग्रेस, तृणमूल काँग्रेसचा पाठिंबा.

शेतकऱ्यांच्या भारत बंदला काँग्रेस, तृणमूल काँग्रेसचा पाठिंबा.

सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करत नसल्याने शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला भारत बंदची घोषणा केली आहे. या भारत बंदला काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि तेलंगाना राष्ट्र समिती समर्थन देण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा रविवारी 11 वा दिवस आहे. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करत नसल्याने शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला भारत बंदची घोषणा केली आहे. या भारत बंदला काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि तेलंगाना राष्ट्र समिती समर्थन देण्याची घोषणा केली आहे.तर, नवीन रणनितीवर शेतकरी संघटनांमध्ये सिंघू बॉर्डरवर महत्त्वाची बैठक सुरू असूनव पुढील योजनांवर चर्चा होत असल्याची माहिती मिळते.
काँग्रेस समर्थन : शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला भारत बंदची घोषणा केली आहे. या भारत बंदला काँग्रेसने समर्थनाची घोषणा केली. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ता पवन खेडा यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, आम्ही आंदोलनाच्या समर्थनार्थ आपल्या पक्षाच्या कार्यालयात प्रदर्शन करु. 

यामुळे राहुल गांधी यांचे शेतकर्‍यांसाठीचे समर्थन अधिक बळकट होईल. तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनीही भारत बंदला पाठिंबा जाहीर केला. तत्पूर्वी TMC चे खासदार सुदीप बंडोपाध्याय म्हणाले होते की पक्ष शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि भारत बंदमध्ये त्यांचे पूर्ण समर्थन करेल, असे ते म्हणाले.

Post a comment

0 Comments