४८ तासांत बिबट्याला पकडा, अन्यधा गोळ्या घालण्याचे आदेश देऊ; वडेट्टीवारांचे वनविभागाला निर्देश

चंद्रपूर : येत्या ४८ तासांच्या आत बिबट्याला पकडा नाहीतर बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश सरकारकडून दिले जातील, असे निर्देश चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत. 
ब्रम्हपुरी तालुक्यातील चिचगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या परिवारांची पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी भेट घेतली. तसेच पीडित कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन केले. चिचगाव येथे एका आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात २ महिलांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही मृत महिलांच्या कुटुबियांची आज पालकमंत्र्यांनी भेट घेतली.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज चिचगाव येथे जाऊन मृतकांच्या कुटुंबियांची भेट घेतली, आणि त्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीचे धनादेश दिले. चिचगाव येथे गेल्या एका आठवड्यात २ महिलांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यापैकी पहिली घटना ३ डिसेंबर रोजी घडली. या घटनेत ताराबाई ठाकरे (५५) या महिलेचा मृत्यू झाला.
बिबट्याच्या हल्ल्याची दुसरी घटना ७ डिसेंबर (सोमवारी) रोजी घडली. या घटनेत सायत्रा ठेंगरी (६०) या महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे पालकमंत्र्यांनी आज चिचगाव येथे जाऊन ठाकरे आणि ठेंगरी या दोन्ही मृत महिल्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. दरम्यान वडेट्टीवार यांनी गावकरी आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, तसेच गावकऱ्यांना आश्वस्त केले.

Post a comment

0 Comments