महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ औरंगाबादच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ.प्रभू गोरे तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रशांत क्षीरसागर


औरंगाबाद(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संलग्न औरंगाबाद महानगर जिल्हाध्यक्षपदी प्रा.डॉ.प्रभू गोरे यांची तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रशांत क्षीरसागर तसेच महानगर जिल्हा सचिव म्हणुन दिपक म्हस्के यांची बहुमताने फेरनिवड करण्यात आली. पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार संघाच्या विभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत औरंगाबाद जिल्हा कार्यकारीणीची  एकमताने निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, प्रदेश संघटक संजयजी भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे यांच्या आदेशानुसार पत्रकार संघाच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयात सन 2021 करीता कार्यकारीणीची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारीणीमध्ये महानगर अध्यक्षपदी अनिल सावंत, जिल्हा संघटक म्हणुन विलास शिंगी, जिल्हा उपाध्यक्षपदी छबुराव ताके, हनुमंत कोल्हे, सरचिटणीसपदी नारायण जाधव पाटील, जिल्हा कोषाध्यक्षपदी मुकेश मुंदडा, प्रसिद्धी प्रमुख पदी सचिन अंभोरे, मनोज पाटणी, जॉन भालेराव, कार्यालय प्रमुख शिवाजी गायकवाड आदिंची एकमताने बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. नुतन कार्यकारीणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

Post a comment

0 Comments