'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील अभिनेत्री दिव्या भटनागर यांचं आज मुंबईत निधन झालं आहे.
गेल्या काही दिवसांपापसून कोरोनाची लागण झाली होती त्यांनतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. 26 नोव्हेंबरला दिव्या यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची तब्येत खराब झाल्यावर त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते.
त्यांना न्यूमोनिया झाल्याची बातमी आहे. दिव्या यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. त्यांचीऑक्सिजन पातळी कमी होत होती, ज्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आयुष्य आणि मृत्यू यांच्या दरम्यान बर्याच दिवसांपासून व्हेंटिलेटरवर झुंज देणाऱ्या दिव्या यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. त्या 34 वर्षांच्या होत्या.
0 Comments