औरंगाबाद, दि.२५ डिसेंबर : शहराचे नाव संभाजीनगर झालेच पाहिजे, अशी आमची देखील मागणी आहे. परंतु फक्त निवडणुका आल्यावरच हा मुद्दा काढणे योग्य नाही. मनापासून हे काम करावे. भावनेचा खेळ आता बंद झाला पाहिजे , आम्ही कधीच असे भावनिक राजकारण करत नाही, विकासाचे राजकारण करत असतो. तसेच ऐतिहासिक औरंगाबादला स्मार्ट करण्याची जबाबदारी सर्वांनीच उचलली तर आपले शहर नक्कीच नंबर एकचे होईल,असा आशावाद माजी राज्यमंत्री, आमदार अतुल सावे यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात व्यक्त केला. वार्तालाप कार्यक्रमाच्या सुरुवातीला जेष्ठ पत्रकार स.सो. खंडाळकर यांनी आ.अतुल सावे यांचे स्वागत केले.यावेळी पुढे बोलताना आ.अतुल सावे म्हणाले की,आपले शहर हे औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने वाढणारे शहर म्हणून ओळखले जाते. जागतिक ऐतिहासिक वारसा असलेले शहर आहे. चळवळीचे मुख्य केंद्र म्हणूनही हे शहर ओळखले जाते. असे असताना या शहराचा विकास हा प्रचंड वेगाने झाला पाहिजे ,यासाठी लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी आणि शहरातील नागरिकांनी योगदान देणे आवश्यक आहे.
मी शहरातील रस्ते विकासासाठी 120 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. यामध्ये प्रामुख्याने 31 रस्ते तयार केले. कचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी 90 कोटी रुपयांचा निधी आणला. शहरातील चौकांचे सुशोभीकरण झाले पाहिजे, यासाठी दत्तक योजना सुरू केली पाहिजे. मी तशा सुचेना, प्रस्ताव दिले आहेत पण पुढे काहिच झाले नाही,अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
मनपाने शहरात हाँकर , पार्किंग झोन तयार केले पाहिजेत. आम्ही कोट्यवधी रूपये खर्च करून रस्ते तयार केले परंतु सध्या या रस्त्यावर हातगाडी चालकांनी अतिक्रमणे केली आहेत. या हातगाडी चालकांसाठी हाँकर झोन तयार केले तर रस्त्यावरील गर्दी व अतिक्रमणे नाहीसे होतील.
शहरासाठी १६८० कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली !
फक्त 55 दिवसात 1680 कोटी रुपयांची पाणी योजना शहरासाठी मंजूर करून आणली. या योजनेची निविदा देखील प्रकाशित करण्यात आली होती. परंतु सत्ता परिवर्तन झाले व ही योजना रखडली. या आधी अस्तित्वात असलेली समांतर योजना ही पुर्णपणे चुकीच्या पद्धतीने राबविण्यात आल्याने ती फेल गेली, असे शेवटी आ.सावे यांनी सांगितले.
आजच्या वार्तालाप कार्यक्रमात जिल्हा अध्यक्ष प्रा. डॉ. प्रभू गोरे, संघटक विलास शिंगी, सचिव दिपक मस्के, प्रसिद्धी प्रमुख मनोज पाटणी,जॉन भालेराव, सतिष छापेकर, तुकाराम राऊत, शिवाजी गायकवाड, कल्याण अन्नपुर्णे, गणेश पवार, सचिन अंभोरे, माजेद खान, आरेफ देशमुख, रफिउद्दिन रफिक, सिद्धी घायाळ,
,निलम कांबळे, बाजीराव सोनवणे,आकाश सावंत
रमेश वानखेडे यांच्या सह विविध माध्यमांचे पत्रकार उपस्थित होते.
0 Comments