संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना पायभूत सुविधा मिळणार - आमदार अंबादास दानवे

पर्यावरण मंत्री( म रा )आदित्यजी ठाकरे यांच्या समवेत सकारात्मक चर्चा*
दिनांक १७ डिसेंबर २०२० रोजी आमदार अंबादास दानवे यांच्या पाठपुराव्यामुळे पर्यावरण मंत्री ( म. रा. )माननीय नामदार श्री आदित्यसाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर जिल्ह्याची पर्यटन विभागाच्या आढावा ची बैठक सह्याद्री विश्राम गृह मुंबई येथे ५:०० वाजता आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आमदार अंबादास दानवे यांनी संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटनास चालना मिळण्याकरिता काही उपाययोजना करण्याची मागणी माननीय मंत्री महोदयांकडे केली त्यात प्रामुख्याने संभाजीनगर जिल्ह्यासाठी ब्रँड अँबेसिडर नेमणूक करण्यात यावी, संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रांचा प्रमोशनल फिल्म किंवा व्हिडिओ बनवण्यात यावा, अजिंठा लेणी परिसरात रोप-वे करण्यात याव, बीबी का मकबरा आणि दौलताबाद किल्ल्यावर साऊंड लाईट शो ची व्यवस्था करण्यात यावी, संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची राज्यात होणाऱ्या विविध ट्रेड फेअरमध्ये मार्केटिंग करण्यात यावी, संभाजीनगर जुन्या शहरात १४५ वारसास्थळे महापालिकेच्या यादीत आहेत जे सरकारी यंत्रणेच्या ताब्यात आहेत त्यांच्या दुरुस्तीसाठी आणि त्यांना पर्यटनाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष लक्ष देण्यात यावे, कातळ कापून तयार घडवलेल्या लेण्या या इजिप्त आणि युरोपियन राष्ट्रात आहेत तिथे अजिंठा आणि वेरूळ लेण्यांच्या पब्लिसिटीसाठी कार्यक्रम हाती घेण्यात यावा तिथल्या ट्रॅव्हल्स एजंट मंडळींसाठी एखादी बैठक आयोजित करून संभाजीनगर कडे लक्ष देण्यात येणार्‍या पर्यटकांना आकर्षित करण्यात सोपे होईल, शहरात राष्ट्रीय वारसा स्थळ असलेले बीबी का मकबरा येथून अजिंठा रस्त्याला लागताना असलेली वाट खराब आहे त्याची निर्मिती मॉडेल रोड म्हणून विकसित केले तर परदेशात चांगला संदेश जाईल, शहरात अनेक शहरांना जोडणारी स्वतंत्र बस व्यवस्था सुरू केली तर शहरात येणाऱ्या पर्यटकांसाठी स्वस्त आणि सोपा ट्रान्सपोर्ट पर्याय उपलब्ध होईल अशी सेवा जिल्ह्यातील पर्यटन स्थळा पर्यंत करता येऊ शकते, नागापूर नजीक अंतुर किल्ला आहे तिथं तर किल्ल्याच्या जवळपासच्या साधारण दहा गावांना आर्थिक उन्नती देऊ शकतो मात्र नागपूर ते अंतुर किल्ला असा वन विभागाच्या अखत्यारीतील या 6.5 किलोमीटर विद्यमान कच्च्या रस्त्याला "ऑल वेदर रोड" मध्ये परावर्तित करावे, जायकवाडी पक्षी अभयारण्य सहा पावरफूल मोटर बोट आहेत पण चालवायला ड्रायवर नाही इथे विशेष लक्ष दिल्यास ऐतिहासिक वास्तू पाहायला येणाऱ्या पर्यटक निसर्ग पर्यटन ना कडे वळवता येईल आणि पेट्रोलिंग वेगळ्या गैरप्रकारांना आळा बसेल, शहरासह जिल्हाभरात पर्यटनाचे जाळे उभारण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण द्यावे निधी सुरुवातीला कमी असला तरी चालेल पण स्वतंत्र आयएएस अधिकारी इथे स्थानिक टीमसह द्यावा, अजिंठा वेरूळ लेणी कडे जाताना परदेशी पर्यटकांची टॉयलेट नसल्याने कुचंबणा होते हजारे दर तीस किलोमीटर नंतर एक स्वच्छ आणि उत्तम टॉयलेट सर्विस ही आजच्या पर्यटनाची गरज आहे, माळीवाड्याच्या मागची बाजू व मोमबत्ता तलावाच्या दक्षिणेस अडवेंचर पार्क साठी फिजिबल जागा उपलब्ध आहे या जागेवर अडवेंचर पार्क उभारण्यात यावे या बैठकीत आमदार अंबादास दानवे यांनी कन्नड तालुक्यात शून्याचा शोध लावणारे आर्यभट्ट यांची समाधी दुर्लक्षित  असल्याचे निदर्शनास आणून दिले त्यावर माननीय नामदार श्री आदित्य साहेब ठाकरे यांनी लगेचच या ठिकाणी मॅथेमॅटिकल गार्डन करू असे आश्वासन दिले याच बरोबर खुलताबाद तालुक्यातील गिरजा प्रकल्प राबविण्याची मागणी आमदार अंबादास जाधव यांनी केली तसेच वेरूळ येथील स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांचे स्मारक व त्यांचा वाडा पर्यटन विभागाकडे हस्तांतरित करून घेण्यात यावा अशी मागणी आमदार दानवे यांनी केली मराठवाड्यात सातत्याने होणार्‍या बिबट्यांचे हल्ले लक्षात घेऊन आमदार दानवे यांनी रॅपिड रेस्क्यू युनिट संभाजीनगर व किनवट साठी मिळावे अशी मागणी केली आमदार अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या सर्वच विषयांवर माननीय नामदार आदित्य साहेब ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला या सगळ्याच विषयांकडे आपण जातीने लक्ष घालू असे आश्वासन दिले.

*अभिजीत पगारे*
प्रसिद्धिप्रमुख शिवसेना
संभाजीनगर

Post a comment

0 Comments