हायकोर्टाचा मोठा निर्णय!! लग्नाचं वचन देऊन SEX करणं म्हणजे बलात्कारच असं नाही.


नवी दिल्ली, दि.१७ डिसेंबर : लग्नाआधी रिलेशनशीपमध्ये अथवा विवाहाचं वचन देऊन अनेक तरुण-तरुण शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. मुलांकडून लग्नाचं वचन पूर्ण झालं नाही तर त्यांच्यावर बलात्काराचा आरोप लावला जातो. या संदर्भात एका याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. लग्नाचं वचन देऊन लैंगिक संबंध ठेवणं हा नेहमीच बलात्कार असतो असं नाही, असा मोठा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं दिला आहे.
एका महिलेनं तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर त्याच्यावर बलात्काराचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. या केसमध्ये तरुणानं महिलेला लग्नाचं वचन दिलं होतं. तर याचिक सुनावणी होत असताना उच्च न्यायालायनं असा निर्णय देऊन केस रद्द केली आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयानं ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला सहमती दर्शवत तरुणाला या प्रकरणातून मुक्त केलं आहे. त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप मागे घेऊन त्याची सुटका कऱण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Post a comment

0 Comments