पहिल्याच टप्प्यात साधारणपणे देशातील 30 कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचा मानस आहे, लोकापर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकारचा असा आहे प्लॅन.देशात आजपासून Corona Vaccine Dry Run, सुरु


नवी दिल्ली, 02 जानेवारी : भारतात आता कोरोना लशीचं ड्राय रन होणार आहे. जगातील सर्वात मोठ्या प्रमाणात हे ड्राय रन होणार असल्यानं त्या दृष्टीनं केंद्र सरकारनं तयारी केली आहे. आजपासून या मोहिमेला सुरुवात होणार आहे. कोरोनाची लस सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी केंद्र सरकारनं नियोजन केलं आहे. या संदर्भात, राष्ट्रीय कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ विनोद पॉल यांनी न्यूज 18 सोबत बोलताना महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

देशातील सर्व जिल्हे आणि केंद्र शासित प्रदेशातील 116 जिल्हे आणि 259 ठिकाणी आज कोरोणा लसीचे सराव अभियान होणार आहे. आजपासून यासाठी नोंदणी करणण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने आज या मोहिमेत सहभागी होणार आहेत. पहिल्याच टप्प्यात साधारणपणे देशातील 30 कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचा मानस आहे. या लोकांची प्राथमिक टप्प्यात निवड करण्यात आली आहे.

Post a comment

0 Comments