छत्रपती संभाजीनगर नामांतरण होणार शिवसेना ठाम: निलम गोऱ्हे

दि. ०६ जानेवारी : निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा औरंगाबाद शहराचा नामांतराचा विषय चर्चेत आला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तर दुसरीकडे याला कॉंग्रेसने पुन्हा एकदा विरोध केला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आमच्या पक्षाचा नामांतराला विरोध असेल असं स्पष्ट केलं आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीत सत्तेत असलेले शिवसेना आणि कॉंग्रेस एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यावर शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपाध्यक्ष निलम गोऱ्हे यांनी शिवसेनेच्या वतीनं पहिल्यादांच आपली भूमिका या संदर्भात मांडली आहे.
संभाजीनगर असं नाव करण्याचा ठराव या अगोदरच शासनाने केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे प्रमुखही आहेत. आम्ही महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष आणि संभाजीनगरचे स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय योग्य त्या वेळेला सरकार करेल. यात शंका नाही. असं म्हणत शिवसेना औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर करण्यात येईल. या निर्णयावर ठाम असल्याचं सांगितलं.

Post a comment

0 Comments