दिल्लीत सुरु शेतकरी आंदोनाच्या समर्थनात राष्ट्रवादीने क्रांतीचौकात केले जन अक्रोश आंदोलन.औरंगाबाद, दि.2 जानेवारी : दिल्लीत सुरु शेतकरी आंदोनाच्या समर्थनात आता राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली आहे. मोदी सरकारने कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी दुपारी एक वाजता शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष विजय साळवे, कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीचौकात जन अक्रोश आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. याप्रसंगी राष्ट्रवादी महीला आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होत्या. किसान विरोधी अध्यादेश पिछे लो, धोरण मोदींचे मरण शेतकऱ्यांचे, मोदी सरकार की पहेचान भारतवासी परेशान, भाजपा भगावो देश बचावो असे फलक हातात घेऊन कार्यकर्त्यांनी कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली.
यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष नवीन मनमोहनसिंह ओबेरॉय, महीला आघाडीच्या शहराध्यक्ष मेहराज पटेल, प्रा.शेख सलीम रफीक शेख भाईजी, अयुब खान, अयुब पटेल, रऊफ पटेल, विशाल पुंड, विकी चावरीया, सोनाली देशमुख, मंजुषा पवार, शमा परवेझ, वैशाली पाटील, सलमा बानो, जैबुन्निसा, इरफान शेख, मिर्झा हमीद बेग, शेख आसिफ, इस्माईल राजा, इम्रान पठाण, जावेद खान, फैसल शाह, शालीग्राम दांडगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a comment

0 Comments