९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार- कौतीकराव ठाले पाटील

औरंगाबाद:- ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार असल्याची घोषणा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांनी औरंगाबादेत केली आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस हे साहित्य संमेलन होणार आहे. कोरोना काळातील हे साहित्य संमेलन असल्याने ते कसे होणार, संमेलनाध्यक्ष कोण असतील याबाबतची घोषणा २३ आणि २४ जानेवारीला नाशिकमधली बैठकीनंतर केले जाणार असल्याचे साहित्य परिषदेतर्फे सांगण्यात आले. संमेलन घेण्यासाठी काही ठिकाणांवरुन निमंत्रण आली होती. यामध्ये मराठवाड्यातील सेलू, अमळनेर, दिल्ली, नाशिक या ठिकाणांचा समावेश होता.
दरम्यान दिल्लीबाबत संजय नहार यांनी दिल्लीला साहित्य संमेलन घेण्याची मागणी केली होती. पण त्यांनीच दिल्लीकरांची ही संधी हुकवली, असा आरोपही ठाले पाटील यांनी केला आहे. "आम्ही दिल्लीला विशेष साहित्य संमेलन घेण्याची तयारी दर्शवली होती मात्र नहार यांनी तो प्रस्ताव नाकारला आणि यामुळं दिल्लीकरांची संधी हुकली" असे ठाले पाटील म्हणाले आहेत. शरद पवार यांच्या सहस्त्रदर्शनासाठी नाशिकला संमेलन घेतलं जात असल्याची चर्चा साफ चुकीची असल्याचे ठाले पाटील यांनी म्हटले आहे.

Post a comment

0 Comments