सातारा शहरानजीक असणाऱ्या वाढे गावात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचारात मतदारांना आपलेसे करण्यासाठी प्रत्येक गटात चूरस वाढली आहे. कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या आयडीया राबवून आपल्या पॅनेलचा प्रचार मतदारांपर्यंत पाेचविला आहे. वाढे गावातील एका पॅनेलने निवडणूक प्रचारासाठी चक्क अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनाच मैदानात उतरविले. प्रिया बेर्डे यांनी एका गाडीतून गावात उमेदवारांसमवेत फेरी मारली. ग्रामस्थांना अभिवादन करुन उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्यानंतर प्रचाराची सांगता झाली. यावेळी प्रिया बेर्डे यांना पाहण्यासाठी वाढे गावासह परिसरातील ग्रामस्थांची गर्दी झाली हाेती. यावेळी बेर्डे यांच्या चल धर पकड या चित्रपटातील धडधडत्या छातीवर हात ठेऊया, शत्रूला मात देऊया गाण्याची सर्वांना आठवण झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
0 Comments