औरंगाबाद.


नांदेड, दि, ०४ जानेवारी : मागील बारा वर्षापासून अखंडपणे देण्यात येणारे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले असून डॉ.शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार औरंगाबादचे डॉ.प्रभू गोरे तर कै.सुधाकरराव डोईफोडे प्रेरणादायी पत्रकारिता पुरस्कार औरंगाबादचे धनंजय लांबे यांना जाहीर करण्यात आला असून दि.5 जानेवारी रोजी होणारा हा सोहळा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आला असला तरी लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
मीमांसा फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, पत्रकार प्रेस परिषद, समीक्षा, ह्युमन राईट्स फाऊंडेशन व मंथन क्रिएटिव्ह ग्रुपच्यावतीने दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त वृत्तपत्र क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येते. यंदाचे हे तेरावे वर्ष आहे. या वर्षी डॉ.शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार मागील अनेक वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत औरंगाबाद येथील मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक डॉ.प्रभू गोरे, वृत्तपत्र क्षेत्रात आपल्या कार्यातून ठसा उमटवणारे औरंगाबाद येथील दै.पुढारीचे निवासी संपादक धनंजय लांबे यांना कै.सुधाकरराव डोईफोडे प्रेरणादायी पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असून स्व.रामेश्वर बियाणी जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार दै.सत्यप्रभाचे गोपाळ देशपांडे, लातूरच्या युवा छत्रपतीचे संपादक वैजनाथ देशमुख यांना स्व.अनिल कोकीळ सामाजीक पत्रकारिता पुरस्कार, कृष्णूरचा धान्य घोटाळा उघड करणारे दै.नांदेड चौफेरचे संपादक मो.आरेफ खान पठाण यांना समीक्षा कर्तृत्व सन्मान पुरस्कार, ग्रामीण भागात लेखणीतून अन्यायाला वाचा फोडणारे कंधारचे दिगंबर गायकवाड यांना डॉ.शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार, वृत्तपत्र क्षेत्रासहीत राजकारणात सक्रिय झालेले नगरसेवक तथा संपादक मुन्तजीबोद्दीन मुनीरोद्दीन यांना स्व.मिर्झा अहेमद अली बेग चुखताई पत्रकारिता पुरस्कार, सातत्याने  भ्रष्टाचारावर प्रहार करणारे दै.आनंदनगरीचे बजरंग शुक्ला यांना पंचनामाकार लक्ष्मणराव गायकवाड निर्भीड पत्रकारिता पुरस्कार, स्व.अनंतराव नागापूरकर वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार शहरातून चंद्रकांत घाटोळ, ग्रामीण भागातून माहूरचे तुळशीराम ठाकरे, वृत्तपत्र क्षेत्रातील जाहिरातीचा आधारस्तंभ दै.एकजुटचे सुनिल मुळे, वृत्तपत्र क्षेत्रातील सहकारी दुवा संगणक चालक राज आडसकर, वृत्तपत्र क्षेत्रातील तिसरा डोळा फोटोग्राफर सिडकोचे सारंग नेरलकर, स्व.माधव अंबुलगेकर युवा पत्रकारिता पुरस्कार नांदेड टुडेचे नईम खान तर स्व.सुरेश पटणे मुद्रण सेवा पुरस्कार सुनिल शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे.
सदरील पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंथन क्रिएटिव्ह ग्रुपचे रामेश्वर धुमाळ, पत्रकार प्रेस परिषदेचे प्रदेश प्रभारी अरविंद जाधव, मराठवाडा अध्यक्ष सखाराम कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश पांडे, माजी अध्यक्ष सुनिल कुलकर्णी, माजी अध्यक्ष गणेश जोशी, कार्याध्यक्ष विश्वास गुंडावार, सहसचिव रविंद्रसिंघ मोदी, महानगराध्यक्ष रविंद्र कुलकर्णी, नांदेड दक्षीणचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील, उपाध्यक्ष ज्ञानोबा पवार तथा संपादक रूपेश पाडमुख यांनी केले आहे.

Post a comment

0 Comments