मंगळवारी मनसेची महत्वाची राज्यस्तरीय बैठक होणार

मुंबई: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मंगळवारी मनसेची महत्वाची राज्यस्तरीय बैठक होणार आहे. सकाळी ११ वाजता वांद्रेतील एमआयजी क्लब इथं ही बैठक होणार आहे. यावेळी पक्षातील पदाधिकाऱ्यांना आपल्याकडील अहवालाच्या स्वरुपात पक्षाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 
स्थानिक स्तरावरील निवडणुका आणि पक्षाची तयारी, पक्ष संघटन आणि बांधणी, स्थानिक स्तरावर राजकीय आणि सामाजिक स्थिती, लोकांचा कल, पक्षात रिक्त असलेल्या पदांच्या नियुक्त्या याबाबत पदाधिकाऱ्यांनी लेखी अहवाल पक्षाला देण्याची सूचना देण्यात आली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं मनसेकडून कम बॅक करण्यासाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. मनसेच्या जुन्या आणि निष्ठावान पदाधिकाऱ्यांनी ७ डिसेंबरला ‘कृष्णकुंज’वर जात राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी राज ठाकरे यांनी नाशिक मनसेत मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले आहेत.

Post a comment

0 Comments