भाजपच्या माजी मंत्र्याच्या घरासमोर शेतकऱ्यांनी टाकलं ट्रॉलीभर शेण

चंदीगड- गेल्या एक महिन्याहून अधिक काळापासून दिल्लीच्या सीमेवर नवीन कृषी कायद्यावरुन शेतकरी आंदोलन सुरु आहे. आपल्या मागण्यांवर आंदोलक शेतकरी ठाम आहेत. मोदी सरकार आणि भाजपविरोधात शेतकऱ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, पंजाबमधील होशियारपूर येथे काही जणांनी भाजपच्या एका नेत्याच्या घरासमोर ट्रॉलीभरुन शेण टाकले. आंदोलकांच्या या कृत्यावर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नाराजी व्यक्त केली असून अशा प्रकारचे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी पंजाबचे माजी मंत्री तीक्ष्ण सूद यांच्या घरासमोर ट्रॉलीभरुन शेण फेकून विरोध दर्शवला. 
या आंदोलक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या उदासीन भूमिकेविरोधात घोषणाबाजीही केली. त्यानंतर तीक्ष्ण सूद यांच्या भाजप समर्थकांनी त्यांच्या नेतृत्त्वाखाली राय बहादूर जोधमल रस्त्यावर धरणे धरले आणि शेण फेकणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. याचदरम्यान पंजाबचे भाजप प्रमुख अश्विनीकुमार शर्मा यांनी या घटनेचा निषेध केला आहे. 

Post a comment

0 Comments