होळकरांचा वाडा इतके दिवस फुकट वापरला - गोपीचंद पडळकर

पिंपरी-चिंचवडः ”होळकरांचा वाडा इतके दिवस फुकट वापरला, आता किल्ल्याच्या संवर्धनासाठी ५० कोटी द्या”, असं म्हणत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर हल्लाबोल केलाय.
वाफगाव किल्ल्याची आज गोपीचंद पडळकरांनी पाहणी केली, वाफगाव किल्ल्याची ती वास्तू जतन झाली पाहिजे, संवर्धित झाली पाहिजे. त्यामुळेच या किल्ल्यासंदर्भात रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांनी त्वरित निर्णय करावा. ही वास्तू सरकारकडे घ्यावी आणि या वास्तूला संवर्धित स्मारकाचा दर्जा द्यावा, अशी मागणीही गोपीचंद पडळकरांनी केलीय. या किल्ल्याच्या संवर्धनासाठी 50 कोटी रुपयांचा निधी द्यावा. ते आता सरकारमध्ये आहेत, सरकार त्यांचं आहे. त्यामुळे आमची मागणी ही कुठल्याही राजकीय हेतूनं प्रेरित नाही, असंही गोपीचंद पडळकरांनी स्पष्ट केलंय.

Post a comment

0 Comments